नवीन लेखन...

ईस्टर संडे

ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर संडे म्हणून हा सण साजरा केला जातो. […]

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव

१० एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शलने फाशीची शिक्षा सुनावली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यावरील अंतिम निर्णयासाठी अगोदर दिलेल्या फाशीला स्थगिती दिली. १७ जुलै २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेसाठीचे भारताचे अपील फेटाळून लावले आणि पाकिस्तानला फाशी स्थगित करण्याचे आदेश दिले. […]

जागतिक आवाज दिवस

हल्लीच्या जीवनात नावासोबतच आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणही दिली आहे. एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता असू शकतो, पण तो हुबेहूब असू शकत नाही. […]

टॉम ॲ‍ण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

१९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम ॲ‍ण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या नव्या सिरीजची निर्मिती केली. […]

जागतिक सर्कस दिन

सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना ‘दुनिया एक सर्कस है’ हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं. […]

दूरदर्शन मालिका निर्मात्या मंजू सिंग

त्यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्या १९७९ साली आलेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटात्यांनी अमोल पालेकर यांच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. पुढे या अभिनेत्री-निर्मात्याने नंतर अनेक टीव्ही मालिका तयार केल्या ज्यांनी तिला लोकप्रिय टीव्ही सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. […]

कथाकार अच्युत बर्वे

अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते. […]

भारतीय रेल्वेचा वाढदिवस

जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्व भूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले. […]

हनुमान जयंती

हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे. […]

गुड फ्रायडे

आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो. […]

1 19 20 21 22 23 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..