नवीन लेखन...

टायटॅनिक बुडाले

टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. अधिकृत आकडेवारी नुसार त्या दिवशी टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाच्या बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा त्यांचे वय फक्त २महिन्याचे होते. […]

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक

वालुकाशिल्प बनवणाऱ्या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किनाऱ्यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकारचा किताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युट देखील स्थापन केले आहे. […]

चित्रकार लिओनार्दो दीसेर पिएरोदा विंची

त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला. चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात. […]

बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी

२००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. त्यांच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरुन व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे त्या जास्त चर्चिली गेली. मंदिरा काही क्रिकेट एक्सपर्ट नाही. तिला क्रिकेटमधलं काहीही न कळणं हाच तर यूएसपी होता! चारू शर्मासह मंदिरा बेदी सूत्रसंचालक म्हणून दाखल झाल्यावर सुरुवातीला जुन्या जाणत्यांनी नाकं मुरडली होती. पण नंतर प्रत्यक्ष मॅचपेक्षा एक्स्ट्रॉ इनिंगचा टीआरपी वाढू लागला. […]

जागतिक कला दिवस

इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले. […]

कैलास जीवन स्किन क्रीम चे सर्वेसर्वा राम कोल्हटकर

कैलास जीवनचे क्रीम ही सर्वांत मऊ व इलाजकारक असल्याची खात्री ते देतात.चंदनाचे तेल, दुवा, शंखजीरा, राळ, तेल तसेच पाण्याचे सममिश्रण करुन त्यापासून हे मऊ क्रीम तयार केला जात. केवळ भारतातच नव्हे तर जगात या प्रकारचे आयुर्वेदिक क्रीम कसे तयार केले जात नसल्याचा कोल्हटकर यांचा दावा आहे. या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरले जात नसल्याने त्याचा परिणाम लगेच दिसून येता असे ही ते म्हणतात. ग्राहकाला कमीत कमी खर्चात हे क्रीम उपलब्ध व्हावे यासाठी हे क्रीम १२ ग्रँम पासून २० ग्रँम पर्यंतच्या ट्यूब मध्ये ही ते उपलब्ध केले आहे. विश्वास व सचोटी हे बीदवाक्य नेहमी पाळले जात असेही ते म्हणतात. […]

चेहरे (कथा)

या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ? […]

अग्निशमन दिवस

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. […]

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]

‘झपाटलेला’ या चित्रपटाला २९ वर्षे झाली

अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे. […]

1 20 21 22 23 24 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..