नवीन लेखन...

जागतिक होमिओपॅथी दिन

होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात. […]

आंस मनांतरिची

लोचनात, माझिया तुझी ती निरागसता डोळेच तुझे बोलती तुलाच आठविताना. तुझ्याच अस्तित्वाचे भास आज जगताना सर्वत्र तुझ्याच खुणा जोजविती स्पंदनांना. दुरत्वाचेच दुःख अंतरी समजाविते आसवांना अव्यक्त भाव निरागस स्वप्नी तुलाच पाहताना तू असावेस या जीवनी साराच जन्म भोगताना ही आंस मनांतरी होती पण काय झाले कळेना वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544906 रचना क्र. १०२. ४ – ४ – […]

जागतिक सिबलिंग डे

असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]

एअर चीफ मार्शल हृषिकेश मुळगावकर

मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते. […]

गायिका अमृता फडणवीस

गायन संगीत, नृत्य, खेळ अशा अनेक कला वेगवेगळ्या स्तरांवर येत असलेल्या अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी न्युयॉर्क फॅशन विकमध्ये कॅटवॉक करत खादी ग्रामोद्योगाचा प्रचार आणि स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्याचा मेसेज दिला होता. […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य,असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली आपुलकीचीच […]

ज्येष्ठ नाट्यनिर्माते उत्तम भदू उर्फ मामा पेडणेकर

त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले. […]

गोमुची पार्टी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १८)

गोमुला दोन महिने हॉटेलचं काम चालू असतांना आणि नंतरच्या एक महिन्याचा पगार व नफ्याचा भाग मिळाला. आजवर गोमु आम्हां सर्व मित्रांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्टी द्यायला लावत असे. आता सर्व त्याच्या मागे लागले की आम्हाला पार्टी पाहिजे. गोमुनेही फारसे आढेवेढे न घेतां पार्टी द्यायचं मान्य केलं. ती सुध्दा तो “आपलेच हॉटेल”मध्येच देणार होता. मी आणि […]

ज्येष्ठ रुद्रवीणा आणि सितार वादक बिंदू माधव पाठक

वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी स्वंतत्र वादन केले होते. ते ऑल इंडिया रेडिओचे ‘ए’ दर्जाचे कलाकार होते. हिंदराज दिवेकर, श्रीकांत पाठक, रामचंद्र व्ही हेगडे आणि ज्योती हेगडे हे त्यांचे काही प्रसिद्ध विद्यार्थी आहेत. बिंदू माधव पाठक हे कर्नाटक विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. […]

जागतिक कोकणी भाषा दिन

कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! […]

1 25 26 27 28 29 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..