नवीन लेखन...

गीतकार नितीन आखवे

संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली. […]

प्रसाद प्रॉडक्शन्सच्या ‘खिलौना’ चित्रपटाची ५२ वर्षे

सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे. […]

नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक

राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत. […]

विनोदी अभिनेत्री सुप्रिया पाठारे

‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती. […]

‘ऐकणारे’ कपडे

जेव्हा ध्वनिलहरींमुळे हवेत कंपनं निर्माण होतात, तेव्हा प्रथम पॅरा-अमाइड व सुती धाग्यांपासून बनलेलं हे कापडं, ही कंपनं टिपून घेतं. त्यानंतर ही कंपनं याच धाग्यांद्वारे, चार थरांच्या धाग्यापर्यंत पोचतात. ही कंपनं नंतर, या धाग्यातल्या बाहेरच्या म्हणजे रबरासारख्या थराद्वारे, दाबाद्वारे विद्युतप्रवाह निर्माण करणाऱ्या थरापर्यंत पोचतात व त्यातून विद्युतप्रवाहाची निर्मिती होते. हा विद्युतप्रवाह तांब्याच्या थराद्वारे छोट्या ध्वनिक्षेपकासारख्या साधनाकडे पाठवला जातो व त्याचं रूपांतर पुनः आवाजात होतं. मुख्य म्हणजे, हा कपडा तीव्र आवाजाबरोबरच अगदी क्षीण आवाजही टिपू शकतो. त्यामुळे, या कापडापासून तयार केलेला कपडा हा एका मोठ्या मायक्रोफोनसारखा वापरता येतो. नुसतंच संभाषण नाही, तर पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाटही या कपड्यांद्वारे स्पष्टपणे ऐकता येतो. हे कापड धुता येतं, तसंच ते धुण्यासाठी धुलाईयंत्रही वापरता येतं. त्यामुळे या कापडापासून तयार केलेले कपडे धुऊन पुनः पुनः वापरता येतील. […]

व्यंगचित्रकार डेव्हीड लो

२० सप्टेंबर १९३९ रोजी इव्हीनिंग स्टँण्डर्ड मध्ये प्रसिद्ध झालेले हिटलर आणि स्टालिन परस्परांना झुकून अभिवादन करतानाचे व्यंगचित्र प्रचंड गाजले होते. दोघांनी एकत्र येऊन पोलंडवर आक्रमण केल्यानंतर डेव्हीड लो यांनी आपल्या खास शैलीतून या व्यंगचित्रातून हिटलर आणि स्टालिनवर टीका केली होती. जर्मनीने त्यावेळी लो यांच्या व्यंगचित्रांविरोधात इंग्लंडकडे रीतसर तक्रारी केल्याचीही नोंद आहे. […]

निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण

१९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले. […]

हॉटेल मॅनेजर गोमु (गोमुच्या गोष्टी- क्रमांक १७)

गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही. असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं. कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं. गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता. त्यासाठी लागणारे भांडवल नव्हतं. आम्ही मित्र त्याच्यापेक्षा जरा बऱ्या परिस्थितीत […]

जगलिंग, जगलर्स,आणि शॅडो प्ले (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ९)

भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. […]

काव्य एक चिंतन

शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे. काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो मन प्रांगण! शब्दाक्षरी […]

1 27 28 29 30 31 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..