नवीन लेखन...

सुप्रसिद्ध लेखक, निर्माता अजेय झणकर

‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता. […]

द चेंज… (कथा) भाग-३

“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!” […]

ज्येष्ठ व्हायोलिन वादक भालचंद्र देव

असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात यांनी दुर्गा राग वाजवीत होते. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. भालचंद्र चे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून भालचंद्र यांना मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती. […]

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक

डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘सख्या रे घायाळ मी हरणी’ हे या चित्रपटातले गीत त्यांच्यावरच चित्रित झाले होते. उषा नाईक यांनी लहान वयापासून शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर नृत्यांगना म्हणूनही त्यांची ओळख तयार झाली. […]

ललिऽताऽऽ

तीस वर्षांत तिने सात भाषेतील एकूण ३०० चित्रपट केले. यामध्ये तिचे सर्वाधिक चित्रपट हे जितेंद्र सोबत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन व श्रीदेवीचे. राजेश खन्ना सोबतही तिने काही चित्रपटांतून दर्शन दिले. […]

ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला.‌ त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली. […]

अनेक नाट्य कंपनीचे सूत्रधार व नाट्यनिर्माता गोट्या सावंत

नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाट्य कंपनीचे सूत्रधार ते नाट्यनिर्माता या साऱ्या आघाड्यांवर गोट्या सावंत यांनी काम केलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्थाच्या साठी काम केले आहे. […]

नकलाकार गोपाळ विनायक भोंडे

गोपाळ विनायक भोंडे लोकमान्य टिळक, भालाकार भोपटकर, शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रँग्लर परांजपे, लोकनायक बापूजी अणे, बॅ. जम्नादास मेहता, रँग्लर परांजपे अशा अनेकांच्या हुबेहूब नकला करत असत. लोकमान्यांसारखीच वेशभूषा करून ते मंचावर येत, आणि लोकमान्यांच्या आवाजात, बोलण्याच्या लकबीत त्यांनी पूर्वी केलेल्या भाषणाची नक्कल करीत. […]

रुबाबदार नि भारदस्त अभिनेते जयराम हर्डीकर

सिंहासन या चित्रपटामध्ये अनेक दर्जेदार अभिनेत्यांच्या मांदियाळीत आपल्या कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी धोक्याची नोकरी पत्करणारा आणि शेवटी राजकारणाच्या पटावर बळी जाणारा त्यांचा ‘पानिटकर’ लक्षात राहतो. […]

ट्रिक सीन्सचे बादशाह नाना शिरगोपीकर

ट्रीक सिन्स ही नानासाहेबांची खासियत. ते त्यांच्या नाटकाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असे. ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री’ सारखे, वेगळ्या विषयावरचे देखील नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. १९७० पर्यंत त्यांचा या व्यवसायात जम बसला. […]

1 31 32 33 34 35 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..