ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे
उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे. […]
उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे. […]
द लिज ऑफ द क्रॉस कीज’ मधे केवळ गैरसमजावर आधारीत विनोद आहे. अप्रत्यक्षपणे चर्चच्या अधिकाऱ्यांवर विनोद आहे. चर्चचे अधिकारी वाईट नसूनही केवळ गैरसमजांतून दुय्यम अधिका-याला बिशपबद्दल खात्री वाटत नाही. चर्चच्या प्रमुखाचे नांव खराब होऊ नये म्हणून चर्चचा दुय्यम अधिकारी टपरीच्या मालकाला टपरीचा भाडेपट्टा चौदाऐवजी एकवीस वर्षांसाठी वाढवून द्यायला सहज तयार होतो. मात्र ज्याच्यामुळे हे घडतं त्या वार्ताहराचं पुढे काय झालं, हे कथेत सांगितलेलं नाही. वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं आहे कारण तें फार महत्त्वाचं नाही. […]
चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए ३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एअरलाइन्सने २५ ऑक्टोबर २००७ सुरु केली. […]
काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन […]
चालले, चालले, चालले आयुष्य चालले, चालले सर्वात, जीव हा गुंतलेला शोधित सुखा मन दंगलेले ऋणानुबंध, हे गतजन्मांचे जपता,जपता दिवस संपले आठवांचे, आभाळ लोचनी भावनांचे ओघळ ओघळले किती स्मरावे किती उसवावे नात्यांचे पदर,आज विरलेले या मनाला किती समजवावे जग सारे मृगजळी हरवलेले दृष्टांत हा वास्तव जीवनाचा भौतिक सुखात मन रमलेले — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. ११०. […]
आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते. […]
खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे. […]
आज नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम अलेक्झांडर यांचा वाढदिवस किंग्ज डे म्हणून साजरा केला जातो. डच लोक त्यांच्या राजाचा वाढदिवस साजरा करतात तेव्हा किंग्ज डे असतो. राजा विल्यम अलेक्झांडर यांचा जन्म २७ एप्रिल १९६७ रोजी झाला. विल्यम अलेक्झांडर हे क्वीन बीट्रिक्स आणि प्रीन्स क्लॉस यांचा मोठे चिरंजीव होत. विल्यम अलेक्झांडर हे त्यांच्या तरुण वयात […]
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions