नवीन लेखन...

चिनी मकाव (कथा)

चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट  बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील. […]

जागतिक पेंग्विन दिन

टार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते. […]

तथास्तू !

त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”. […]

सुवेझ कालव्याच्या बांधकामाची सुरुवात

सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग २

कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं. […]

परीक्षेची विश्वासार्हता

परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्था मध्ये परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून मूल्यमापन शब्द अजूनही अस्तित्वात आहे. […]

माकडाचा पंजा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १४)

जेकबज् हा त्याच्या काळांत विनोदी प्रहसन म्हणजे फार्स लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. तो अधूनमधून भय कथा लिहित असे. आजही तो “मंकीज पॉ” ह्या भयकथेसाठीच प्रसिध्द आहे. माणूस एखादी इच्छा करतो पण ती पूर्ण झाली तर परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. ही कथा सुपरनॕचरल प्रकारांत मोडते. त्याने बऱ्याच कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. त्यापैकी कांहीवर चित्रपटही आले. मंकीज पॉ ह्या कथेवर चित्रपट, नाटक, टीव्ही, इ. सर्व माध्यमांतून अनेक आविष्कार आले. मूळ इंग्रजी कथा ३८००हून अधिक शब्दांत लिहिलेली आहे. मी तिचं मराठी रूपांतर साधारण २३०० शब्दांत केलं आहे. […]

प्रकाशन व्यवसायातील स्थित्यंतरे

पुस्तकाच्या छापील किंमतीवर ७०,८० व (खोटं वाटेल पण) ९०टक्के कमिशनचा हट्ट धरणे, स्वीकृत हस्तलिखीत प्रकाशकाडून हरवले गेल्यास, त्याचे सोयरसुतक न मानता त्याबद्दलची कसलीही भरपाई न देणे, पुस्तक प्रकाशनाचे समारंभ लेखकांला त्यांच्यश खर्चाने करायला लावून, त्याद्वारे आपल्याच प्रकाशन संस्थेची विनाखर्च जाहिरात करणे; अशा कटू अनुभवांना नवलेखकांना सध्या सामोरे जावे लागते. […]

ध्येयसिध्दी करताना तुम्ही चुका करता का?

ध्येय असणे हे फार महत्वाचे आहे कारण त्यातूनच तयार होणारा नकाशा तुमच्या आयुष्याला दिशा देतो. ध्येय तुम्हाला तुमच्या संपूर्ण वाढीसाठी विकासासाठी आव्हान तयार करतात. ध्येय तुम्हाला कधी काळी तुम्हाला अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यास मदत करतात. स्वतःचे वैयक्तिक ध्येय ठरवणे फार आवश्यक आहे कारण जर तुम्ही तसे नाही केलेत तर बऱ्याचदा तुम्ही तुमचा वेळ व काम इतरांची ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करता. […]

रेल्वेस्टेशन्स – भारतीय संस्कृतीचं दर्शन

रेल्वेची भराभराट होत गेली, तसतशी रेल्वेमार्गावर स्टेशनच्या रूपात आलेली, पण एके काळची नगण्य असलेली अनेक खेडी उजेडात आली. खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं, तर शहरांची महानगरं बनली. प्रत्येक स्टेशन हे त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि ही स्टेशनं विविध व्यवसायांची केंद्रस्थानंही बनली. […]

1 7 8 9 10 11 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..