कथा लेखक ग. ल. ठोकळ
साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’ […]