नवीन लेखन...

तुझ्याच स्वप्नात रंगले मी

“तुझ्याच स्वप्नात रंगले मी” साजणा, तुझीच स्वप्ने पाहत होते तुझ्या स्वप्न-प्रेमात मी दंग होते अवचित नयन उघडता नवल घडले, साक्षात तुझ्या मिठीत मी उभी होते. अजुनी अर्धोन्मीलित नेत्र माझे त्या आवडत्या धुंदीत विसावलेत ही तुझी मिठी, हा तुझा स्पर्श, अजुनी मला स्वप्नवत भासताहेत. नको करूस आग्रह डोळे उघडण्याचा असेच मला तुला पाहू दे तुझ्या हाताची कव […]

जागतिक व्यंगचित्रकार दिन

१८९५ मध्ये पहि‍ले रंगीत व्यंगचि‍त्र द यलो कीड प्रकाशि‍त झाले होते, त्याची आठवण आणि‍ व्यंगचि‍त्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागति‍क व्यंगचि‍त्रकार दि‍न म्हणून साजरा करण्यात येतो.  […]

संगीताचं विद्यापीठ – गांधर्व महाविद्यालय

संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे. […]

जीना यहाँ, मरना यहाँ !

राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे. […]

कन्नुदादा (एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

कन्नुदादाशी आणि माझी ओळख कशी झाली, आणि तो आमच्याकडे कधीपासून येऊ लागला हे आता आठवतही नाही.  घरात काही मोठं काम करायला काढलं, म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता, माळ्यावरचं सगळं जड सामान काढून माळा स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवणे, घरात काही समारंभ असला किंवा लग्नकार्य असलं की सामानाची ने आण करणं अशा कामांसाठी मी त्याला मदतीला बोलावून घेत असे. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ८

आता मी तो फोटो नीट निरखून पाहिला, तर आजोबा वाटतील असे प्रेमळ भाव स्वामींच्या चेहऱ्यावर होते. खूप दिलासा आणि आपुलकी निर्माण झाली माझ्या मनात. मनोमन मी फोटोला नमस्कार करुन आईजवळ आले. […]

ज्ञानपीठ पुरस्कार

२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. […]

आंतरराष्ट्रीय चहा दिन

चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते. […]

मनाची रचना

मन,देह आणि आत्मा यांचे क्लिष्ट मिश्रण म्हणजे मानव ! या तिघांची एकमेकांशी जुळवून घेण्याची सतत धडपड सुरु असते. आणि त्या जुळणीवर आणि परस्परांमधील समन्वयावर व्यक्तीचे आरोग्य आणि चैतन्य अवलंबून असते.माणसाचे वर्तन, मानसिक प्रक्रिया,संवाद या तिघा घटकांवर अवलंबून असतात. […]

जागतिक दहशतवादविरोधी दिन

सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो. […]

1 11 12 13 14 15 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..