लोकल
पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो. […]