नवीन लेखन...

निशिगंध

तू जो दिला होतास ना निशिगंध तो आता हरवला आहे पण त्याचा सुगंध येतो नेहमी कुठल्यातरी कोपऱ्यातून… तू दिलेलं प्रत्येक फुल नाही ठेवता आलं जपून पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून… — आनंद

नकोशी (कथा)

मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो. […]

मैदानाचा मृत्यू

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
[…]

कागदा, कागदा बोल रे काहीतरी !

आपल्यातील सुंदर नात्याचा अस्त कधी,कसा आणि कां झाला, कळलेच नाही. एकेकाळी फार गळ्यात गळा नसले तरी गेलाबाजार आपल्यात बऱ्यापैकी संबंध होते. खूप काही सुचायचं, आत काहीतरी रटरटत असायचं. खूपदा सकाळी उठल्यावर मस्त लिखाण व्हायचं. त्याला कुठलाही फॉर्म वर्ज्य नव्हता. हातात हात धरून मस्त वाटचाल सुरु होती. लिहिलेलं छापूनही यायचं. बोटांना जणू परीस चिकटला होता. उमटलेला,हाती घेतलेला प्रत्येक शब्द झळाळून जायचा. थोडंफार नांव झालं. शब्दांमुळे कधी व्यासपीठही मिळालं. किंचित आणि क्वचित कमाई झाली.खूप जीवाभावाचे मैत्र झाले-ही कमाई अधिक मोलाची ! […]

जागतिक हास्य दिन

जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!! […]

प्रत्येकाला इथं दुःख असतं

प्रत्येकाला इथं दुःख असतं असतं फक्त ते दिसतं नसतं, हास्य वरवर सगळीकडे असं म्हणून त्यात ते कळतं नसतं.. गैरसमज करणं इथं तर खूप सोप्प सहज असतं, किंवा गैरसमज करुन घेणं नित्य रोज होतं असतं.. तू मला बोलला मग मी राग तुझ्यावर तो धरेन, दोन शब्द तुला जास्त बोलेन हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं.. दुसऱ्याला गृहीत धरण […]

वाटणी (कथा)

प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते.. […]

चालणारा पोपट

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला. […]

कथा कर्जत स्टेशनची

दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. […]

1 14 15 16 17 18 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..