सौदा (कथा)
नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.) […]