प्रवाशाची विचित्र व भयानक पलंगाची गोष्ट – भाग पहिला (संक्षिप्त रूपांतरीत कथा २१)
शिक्षण संपल्यावर मी शशिकांत देशमाने कलकत्त्याला एका बंगाली मित्राबरोबर रहात होतो. आम्ही तरूण होतो आणि त्या रंगीन नगरींत मजा करत होतो. एकदा व्हीक्टोरीया मेमोरीअल जवळच्या भागांत आतां काय मजा करावी ह्या विचारात असताना, माझा मित्र आपण रॉयल क्लबमधे जुगार खेळायला जाऊया म्हणाला. रॉयल क्लबच्या जुगारांत मी बरेचदा पांच/दहा रूपयांच्या खूप नोटा घालवल्या होत्या, कधी कमावल्याही होत्या. […]