नवीन लेखन...

भद्रकाली प्रॉडक्शनचा वर्धापन दिन

‘चाकरमानी’ हे ‘भद्रकाली प्रॉडक्शनचं’ पहिलं नाटक होते. त्यानंतर त्यांनी ‘केला तुका झाला माका’, ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘अफलातून’ ‘रातराणी’ ‘भैया हातपाय पसरी’ यांसारखी ३८ नाटकं केली. ‘भैया हात पाय पसरी’ चे १०१ प्रयोग केले…. […]

हळवा कोपरा

मातृदिनाच्या दिवशी अनेकांनी लिहिलेल्या आठवणी वाचून मी खूपच अस्वस्थ झाले होते. आई होती पण तिची माया प्रेम मिळाले नाही. बाकीच्या गोष्टी नाहीच. असो मला लिहायला जमले नाही म्हणून आईचे उपकार कधीच विसरणार नाही. उलट मीच तिला समजून घेतले नाही. याचेच खूप खूप वाईट वाटते. तिला व्यक्त होता आले नाही म्हणून तिची माया प्रेम कमी होती असे नाही. परिस्थितीने ती हतबल होती. पण तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आयुष्यात खूप काही करु शकले. […]

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले […]

गुदमरलेला श्वास

आज मी कां कुणां दोष द्यावा भोग माझ्या प्राक्तनाचाच आहे पुण्यही माझे, ते पापही माझे भोगणारा, मीच एकटा आहे वात्सल्य, केवळ जन्मदात्यांचे आशीर्वाद तोच जगवितो आहे ऋणानुबंधी नाती सारी मृगजळी या कलियुगाचा नग्न दृष्टांत आहे प्रीतभावनांचे भास सारे बेगडी जीव स्वार्थी सुखात गुंतला आहे ना लळा, जिव्हाळा, प्रेम माया निर्जीवी भावनांचाच स्पर्श आहे सांगा, जगी आज […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय. […]

अनोळखी

काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा. […]

सफर

हिंदीतल्या “सफर”ला इंग्रजीत “SUFFER “कां म्हणतात हे काल नव्याने कळलं ! […]

कालचक्र

यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा. रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा. वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित. त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला. नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं .. याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल. दादा-वहिनी म्हणा हवं तर .. पण हा गेले काही दिवस बघतोय […]

वपु नव्हे .. अत्तराची कुपी!

खरं तर त्यांच्या प्रत्येक कथेवर चित्रपट निर्मिती होऊ शकते.. मात्र तसं काही फारसं प्रत्यक्षात घडलं नाही. त्यांच्या साहित्यावर इनमीन, तीनच मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.. १९७० साली वपुंच्या कथेवर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट, २०१२ साली त्यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर आधारित ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१५ साली वपुंच्या ‘बदली’ या कथेवरुन ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती झाली होती.. […]

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’ […]

1 4 5 6 7 8 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..