निपटारा – भाग 2
काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही […]