मुंबई-डेहराडून एक्सप्रेस
भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात. मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व […]