नवीन लेखन...

ट्रेक ऑन

ऋतू फूड्स आणि Trendy Bytes Ladoowala हे व्यवसाय सांभाळून गेली २८ वर्षे सह्याद्रीमध्ये भ्रमंती, २०० हून अधिक गडकिल्ल्यांवर भ्रमंती, ‘शिवकाव्य’ हे शिवचरित्र प्रकाशित. […]

जागतिक कोड दिन

त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. […]

क्रेडिट कार्ड (अलक)

आयुष्यातलं पहिलंवहिलं क्रेडिट कार्ड घेऊन तो घरी आला. कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं. थोड्या वेळानं म्हणाली, “पोहे करतेय. आठ आण्याची कोथिंबीर घेऊन या.” “आणतो, पण सुटे नाहियेत, तेवढे दे.” “आणा क्रेडिट कार्डावर!”. “?” संजीव गोखले, ०३ जून २०२२.

आवड तुमची अंदाज आमचा

न्याहरीची तऱ्हा या नावाने कविता पाठवली होती. आणि अनेकांच्या प्रतिसादांतून आम्ही काही स्वभावाचा अंदाज बांधला आहे. आर्थात अंदाज म्हणजे अगदी खरा किंवा चूक असा नसतो म्हणून फार मनावर घेऊ नये आणि तसेही मी फार मोठी मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे विनंती आहे की वाचा आणि सोडून द्या. आहे काय नाही काय. पण अंदाज यासाठी गाढा अभ्यास करावा लागतो? म्हणून आता मी जे अंदाज बांधले आहेत ते पडताळून पाहण्याची गरज नाही. […]

आमचंही – ‘खमंग आणि खुशखुशीत’

लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं. […]

अभिनेता पराग बडेकर

आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. […]

भारताने पहिला विश्वचषक जिंकला

१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. […]

भारतीय कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा झाला

हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली. […]

वेगळा (कथा) भाग २

जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, […]

गिरीश कर्नाड !

पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो. […]

1 10 11 12 13 14 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..