गंगा दशहरा
जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे. […]