नवीन लेखन...

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. वालमंजुळ

देशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत. […]

महान गायक नट स्वरराज पं. उदयराज गोडबोले

‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला. […]

ज्येष्ठ लेखक डॉ. प्रभाकर माचवे

डॉ. प्रभाकर माचवे यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत त्यांनी भारतीय साहित्य, धर्म आणि संस्कृती, तत्वज्ञान, गांधीवाद शिकवले. त्यांना जर्मनी, रशिया, श्रीलंका, मॉरिशस, जपान आणि थायलंड इत्यादी देशांच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले गेले होते. […]

केसरी चे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर

आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“ […]

गरीबीला अश्रूंचे वावडे

“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं. […]

नामवंत कथाकार प्रकाश संत

कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत. […]

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते चंद्रशेखर

आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती. […]

जीवनातील प्रश्न

वर्षावती अखंड जीवनी परागकण छोटे छोटे अगणित असे चैतन्यकण अमोलिक असतो अविरत अपूर्व आनंद जपण्यात जगण्यातले सारे इवलेपण इवल्या गोजिऱ्या हळव्या कळ्या नाजूक निष्पाप कोवळ्या पाकळ्या फुलतानाही बिचकत दचकत अवघडलेल्या उबदारशा एका ओंजळीस आसुसलेल्या निर्माल्यणापूर्वी हृदयी धरुन येतील फुलवता मळे का? अथक, अखंड ध्यास हव्यासाचा धडपड मी माझा जोपासण्याचा सोडून भास मृगजळ गाठण्याचा का न वहावा […]

कोण स्वदेशी कोण परदेशी

पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.  यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला. […]

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले. […]

1 25 26 27 28 29 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..