श्री लक्ष्मीनृसिंह संस्थान, वेलींग
लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा. […]