नवीन लेखन...

गायिका गौरी पाठारे

२०१९ मध्ये स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार गौरी पाठारे यांना मिळाला आहे. या बरोबरच गौरी पाठारे यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळाले आहे. त्यांच्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. गौरी पाठारे यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत. […]

स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते ना. ग. गोरे

१९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. […]

मोहिनीअट्टमच्या महान कलाकार डॉ. कनक रेळे

भारतीय शास्त्रीय नृत्य हा एक वेगळा उपक्रम अभ्यासक्रमात यावा व विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे. शास्त्रीय नृत्याकडे जनसामान्यांनी सन्मानाने पाहावे. या विषयातसुद्धा आपण पदवी प्रदान करू शकतो याकरिता केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या डॉ. कनक रेळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने १९६६ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले. […]

सीमाभिंती

या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे. […]

मुलगी शिकली

स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत, तिचं आयुष्य जडलं होतं. जन्म देणं अन् रांधून वाढणं, इतकंच तिचं कर्म होतं. किंमत तिच्या शब्दाला नव्हती, शिकण्याची गरज वाटत नव्हती. अबला अबला म्हणून आधाराने, जगत ती रहात होती. तिला शिकून करायचंय काय?, घरातच राहणार तिचा पाय. तोंड तिने उघडायचं नाय, दोन वेळचं जेवण,वर्षाकाठी लुगडं – जगायला आणखी लागतंय काय? गृहलक्ष्मीच्या हातातच लक्ष्मी नव्हती, […]

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

‘हमने जिना सीख लिया ‘या हिंदी चित्रपटाद्वारे २००७ मध्ये सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला. २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. […]

पहिलीपासूनचे सोबती

माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला.. […]

ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संघटनेवर ते अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून सक्रिय राहीले आहेत. […]

पहिला मराठी शब्दकोश तयार करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ

आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. […]

महाराष्ट्रातील मोठे नेते राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव आहे. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. […]

1 28 29 30 31 32 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..