आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे
रवि परांजपे यांची शैली अनोखी होती. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसत असे. दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली. […]