ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे
महेश म्हात्रे यांनी आपले महविद्यालयीन शिक्षण मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या वाडा गावात पूर्ण केले. तिस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या म्हात्रे यांचे शिक्षण एम ए (इतिहास) पर्यंत झाले असून, आज ते भारतातील ज्येष्ठ पत्रकार मानले जातात. महेश म्हात्रे यांचा पत्रकारितेचा प्रवास दैनिक मुंबई सकाळ मधुन सुरु झाला. तिथे त्यांनी केेलेल्या शोधपत्रकारितेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आदिवासीबहुल जव्हार-मोखाडा परिसरातील कुपोषण, गुजरात मधील अटक वॉरंट रॅकेट आदी बातम्यांमधून त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले. त्यानंतर म्हात्रे यांना राज्यातील राजकीय घडामोडींवर लिहिण्याची संधी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून मिळाली. […]