ऋणानुबंध (कथा)
आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम. […]