नवीन लेखन...

जागतिक सायकल दिवस

हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो. […]

कीर्तनकार चारुदत्त आफळे

कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला. चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई […]

सरहद्दगांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खानअब्दुल गफारखान

बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. […]

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डॉक्टरला निलंबित केले होते. […]

गायिका, अभिनेत्री सुंदराबाई जाधव

सुरुवातीच्या काळातील त्यांच्या ध्वनिमुद्रिकांतील गायनाच्या शेवटी त्यांची ‘सुंदराबाई ऑफ पूना’ अशी उद्घोषणा असे. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची संख्या सुमारे ७५ (१५० गीते) आहे. या ध्वनिमुद्रिकांच्या विलक्षण खप व लोकप्रियतेमुळे एच.एम.व्ही.ने त्यांना विशेष सुवर्णपदक देऊन गौरविले होते. ‘एरी माँ मोरा मन हर लीनो’ (भीमपलास), ‘अत मन भाये’ (कामोद), ‘तू सांई सब का दाता’ (दुर्गा), ‘कुंजबन में सखी’ (यमन) या ख्यालांच्या ध्वनिमुद्रिका; ‘तुम्ही माझे सावकार’, ‘कठीण बडोद्याची चाकरी’, ‘खूण बाळपणात’, ‘सखे नयन कुरंग’, ‘ऐकुनी दर्द आले डोळ्याला पाणी’, ‘कुठवर पाहू वाट’ अशा खास लावण्या त्यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी गायल्या. ‘भोळे ते नेत्र खुळे’, ‘देवा मी बाळ तुझे’, ‘तुझ्याविण गोपगोपींना’ अशी भावगीते त्या स्वत: चाली लावून गायल्या. […]

अपना इंडिया

सन २००५ आणि २००६ या कालावधीत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस असताना या शहराचा गाभा माझ्या अधिकार क्षेत्रात मोडत होता. रेल्वे स्टेशन ला लागून असलेला बी केबिनचा भाग, ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी,पाच पाखडी, चंदन वाडी, खोपट, चरई, उथळसर, कोलबाड इ. इ. […]

आवडणारे गंध

स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.  […]

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

व्यक्तता

शब्द थकले, मौनही आज थकले सांगा नां, आज व्यक्त कसे व्हावे भावनांचा श्वास आज गुदमरलेला सांगा नां, जगणे सुलभ कसे व्हावे कधीतरी सहज मनमोकळे करावे कां उगा ? सांजवेळी साशंक व्हावे अव्यक्ताचे, जीवनी अर्थ वेगवेगळे मनीचे सारे सत्य बोलुनी मुक्त व्हावे आज नां, कुठलीच याचना अपेक्षा तरीही, जीवनी निश्चिंत कसे व्हावे तड़जोड जीवनी, हीच मन:शांती हेची […]

चंदन

तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे? मीही नाही रे पाहिलं आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते हरवतो तो न जाणो किती दिवस. अगदी अगदी दडून बसतो अवचित मग कधी […]

1 45 46 47 48 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..