नवीन लेखन...

तुझ्या मलमली मिठीत

तुझ्या मलमली मिठीत मी अलगद मुग्ध व्हावे, ओढ हलकेच तुझी लागता भूल आल्हाद हृदयी जपावे काय असेल तो रम्य क्षण तू मिठीत मज अलवार घेता, लाजेल मी रोमांचित होऊन स्पर्श होईल तुझा नाजूकसा का भूल मला पडली तुझीच आस तुझी अंतरी लागता, ती मिठी उत्कट अबोध व्हावी होतो मोह तुझा अधर भावना किती कितीक समजावू मनाला […]

पाऊलवाटा

वाट, चढणीची गडकोटी सदैव मी तुडवित राहिलो उरली आता चारच पाऊले आता माथ्यावरी पोहचलो आव्हानी पत्थर पाऊलवाटा दुर्दम्य! विश्वासाने चाललो सभोवारी हिरवीगार सुखदा गतस्मृतीं कुरवाळीत राहिलो छेड़ितो शीतल पवन धुंदला झुळझुळ ती झेलित राहिलो नेत्री आठवांचे निर्झर सुंदर जिथे नाहलो, तुडूंब डूंबलो सारिपाट साऱ्या जीवनाचा मी आज उलगडित राहीलो काय मिळवले काय हरवले मी मना समजावित […]

वेणूताई यशवंतराव चव्हाण

यशवंतराव हे दिल्लीत महाराष्ट्राचे वैभवस्थान होते, तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक. त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी घसरला नाही. मंत्र्याची पत्नी कशी असावी, तिचा पेहेराव व वागणूक कशी असावी, याच्या त्या आदर्श होत्या. वेणूताईंचे आदरातिथ्य पाहुण्यांना, नातेवाईकांना आश्चर्यचकित करीत असे. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची सुख-दु:खे त्या आपलीच समजत. महाराष्ट्रातील सर्व सण त्या उत्साहाने साजरे करीत. नरक चतुर्थीला बंगल्यातील सर्वाच्या घरी अगदी साडेसात-आठलाच फराळाचे ताट येत असे. वेणूताईंना मंगळसूत्राखेरीज इतर दागिन्यांची हौस नव्हती. […]

राष्ट्रीय वाढदिवस दिन

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुले जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. […]

लिंबलोण उतरू कशी ?

“एकटी ” मधल्या सुलोचना दीदी कायम “आई “दिसल्या – मुलामध्ये आणि संकटांमध्ये ठाम उभ्या असलेल्या आईसारख्या ! […]

चित्रकार रावबहादूर माधव विश्वनाथ धुरंधर

जलरंगांची सखोल जाण हे त्यांचे वैशिष्टय़. आपल्या निष्ठांशी आणि कलेशी प्रामाणिक राहिलेल्या या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच १८९५ मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या धुरंधरांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये व ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होता. […]

कात्रीची करामत

वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत… […]

प्रभात फिल्म कंपनीचा ९३ वा वर्धापनदिन

पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामले मामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. […]

अभिनेता टॉम हॉलंड

अभिनेता टॉम हॉलंड यांचा जन्म १ जून १९९६ रोजी लंडन येथे झाला. थॉमस स्टैनली हॉलड हे टॉम हॉलडचे खरे नाव. त्याचे शिक्षण लंडन येथील डॉनहेड प्रिपरेटरी स्कूल, विंबलडन कॉलेज, बीआरआईटी स्कूल ऑफ परफार्मिंग आर्ट्स येथे झाले. सपासप जाळे विणून या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडणारा स्पायडर मॅन बच्चे कंपनीचा जबरदस्त फेव्हरेट आहे. हा पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेला […]

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टी चा वाढदिवस

१९४८ साली, गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या. […]

1 47 48 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..