नवीन लेखन...

परळ

परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, […]

जाणती मुलं माझी

माझे विद्यार्थी खूपच समजूतदार होती म्हणून मला अजिबात त्रास झाला नाही. कुणी आलं की ऑफिसात जावे लागले तरी मुलं शांत बसून अभ्यास करायची. कधीच रागवाव लागलं नाही. जाणती होती ती. त्यांना शिवरायांचे चरित्र म्हणून एक विषय होता. आणि आवडीने मनापासून ऐकायची शिवाजी महाराजांचे चरित्र. आणि एकदा एक पालक बाई म्हणाल्या की बाई माझा मुलगा अबोल लाजाळू आहे पण त्याला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नुसते उभे केले तरी चालेल पण मला एकदा डोळे भरून त्याला रंगपचावर पहायच आहे. दरम्यान मी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे पाहिले होते आणि विचार चक्र सुरु झाले. ठरविले माझी मुले पण जाणतीच आहेत याच्यातूनच जाणता राजा सादर करायचा. […]

कथा-पटकथा-संवादलेखक शिवराम श्रीपाद वाशीकर

शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ‘ज्ञानेश्वर’, ‘गोपाळकृष्ण’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेले बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचाच ते अभ्यास करीत. त्यांची भाषा साधी पण ठाशीव होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे. […]

रम्य ते बालपण : मोहन वर्दे

आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल. […]

भुयारी रेल्वे

खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही. […]

वरदहस्त: पंडित विनायक काळे सरांचा

१९७८ साली दहावीची परीक्षा मी ८३.१४ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. त्यावेळी हे मार्क खूपच चांगले होते. कारण या मार्कांवर मला कोणत्याही उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकणार होती. आमच्याच शिक्षण संस्थेचे बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी अॅडमिशन घेतली. मला विज्ञानापेक्षा कला शाखेची जास्त आवड होती. पण कला आणि वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत अॅडमिशन […]

इथून तिथून, मिथुन

फटीआयआय मध्ये अभिनयाचं शिक्षण घेऊन, १९७६ साली ‘मृगया’ चित्रपटातून त्यानं रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली. सडपातळ, सावळ्या रंगाचा व घोगरा आवाज असलेला मिथुन पहिल्या चित्रपटालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व त्याची घोडदौड सुरू झाली. ‘सुरक्षा’ व ‘तराना’ मध्ये तो रंजितासोबत, बेलबाॅटममध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांमधील, सर्वच गाणी उत्तम होती. इथूनच त्याची ‘टिपिकल’ नाचण्याची स्टाईल, लोकप्रिय झाली. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय. […]

1 4 5 6 7 8 49
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..