नवीन लेखन...

गरीबी हटाव

(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -) स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते म्हणाले गरिबी हटाव! त्यानंतर कित्येक पंतप्रधानांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक मुख्यमंत्र्यांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक मंत्र्यांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक आमदाराने खासदारांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर त्यांच्या कित्येक बगल बच्यांनी आपली गरिबी हटवली स्वातंत्र्य मिळून […]

प्रशासन व विकास : निष्कर्ष

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये अनिल गोकाक यांनी लिहिलेला हा लेख मी १९६४ साली भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. खरं पाहता माझी भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय प्रशासन सेवा या दोन्ही सेवेत निवड झाली होती. परराष्ट्र सेवेत निवड होणं हे अधिक प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण तो कालखंड देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पं. जवाहरलाल नेहरूंच्या […]

फिस्ट ऑफ गॉड

काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला. […]

पाऊसधारा

क्षणक्षण सारे होता धुसर पापण्यातूनी दाटती पाझर व्याकुळ,कृष्णमेघ सावळे त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर सृष्टिचे रूप अवीट मनोहर तोषवीणारा मृदगंध अनावर लपंडाव तो उन सावल्यांचा मोहवितो मनामनास निरंतर चिंबचिंब ओल्या पाऊसधारा सुखद सरिंची रिमझिम सुंदर आसक्त, ओढ़ प्रीतसखीची तनमन हृदया लागे चिरंतर जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी प्रीतभावनांचे अंतरी गहिवर ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी कृपाळू, कृपावंत तो दिगंबर — वि.ग.सातपुते […]

वेगळा (कथा) भाग ४

नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता […]

गुरुदक्षिणा

आज हे पत्र लिहायलाच हवं. एक वर्ष उशीर झालाय. मागील गुरुपौर्णिमेला संकल्प सोडला होता या पत्राचा आणि वर्षभरानंतर तो पूर्ण होतोय. उशिराला कारण काहीच नाही. सारंगकडून तुमचा पत्ता मिळाला पण तो लिफाफ्यावर असणार. आतमध्ये काय? हे सगळं “आतलं ” तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलेल्या ओसंडून वाहणाऱ्या पोतड्यांची देणगी आहे. हे व्यक्त व्हायला गुरुपोर्णिमेसारखा मुहूर्तच हवा. […]

वेध ५०० व्या प्रयोगाचे

दरम्यान माझ्या गाण्यांच्या अनेक कॅसेटस् व सीडीज मार्केटमध्ये हिंदी भजनांच्या प्रकाशित होत होत्या. हिंदी-ऊर्दू गझलच्या आणि कॅसेटसने माझे नाव संपूर्ण भारतभर पोहोचवले होते. कार्यक्रमांच्या निमित्तानेही संपूर्ण देशभर मी फिरत होतो. या सर्वांची पोचपावती लवकरच पावली. ‘अचिव्हर ऑफ दी मिलेनियम ॲवॉर्ड १९९९’ या मानाच्या पुरस्कारासाठी एक गझल-गायक म्हणून माझी निवड झाली. हॉटेल ताज पॅलेस, नवी दिल्ली येथे […]

श्रीगुरुस्तवन

ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे. […]

सहप्रवासी (कथा)

फर्स्ट क्लासचा प्रवासी होता तो. मागच्याच स्टेशनवर भरपेट खाऊन, – पिऊन सुध्दा – केबिनमधल्या बर्थच्या मऊ मुलायम कव्हर घातलेल्या गादीवर, सर्व गात्रे सैल सोडून डुलकी घेत, शांत निद्रेची वाट बघत पडला होता. पण डुलकी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळाची नव्हती. […]

1 9 10 11 12 13 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..