July 2022
गझल रेकॉर्डिंग आणि ४०० वा कार्यक्रम
या संपूर्ण काळात पं. विनायकरावजी काळे आणि श्रीकांत ठाकरे गाण्याचे शिक्षण या गुरुंकडे माझे सुरूच होते. माझ्या गझल गायकीतील प्रगतीबद्दल श्रीकांतजी खूष होते. ‘दिलोजानसे’ या गझल अल्बमनंतर आजपर्यंत मी अनेक चित्रपटगीते व इतर गाणी गायलो होतो. पण गझलचे रेकॉर्डिंग काही झाले नव्हते. श्रीकांतजींच्या मते आता गझलचा पुढचा अल्बम करायची वेळ आली होती. यावेळी गायिका रंजना जोगळेकरबरोबर […]
भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड
१९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली. […]
इंग्रजी रहस्यकथाकार अर्ल स्टेनले गार्डनर
अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी मुख्यत: ओळखला जातात ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच. […]
‘हरवलेल्या’ शहरांचा शोध
अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. […]
एक परीस स्पर्श… ( भाग -२८ )
साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते… […]
देवभूमीतील पंचबद्री – योगबद्री
हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी […]
गाय द मोपुसाँतची चरीत्र-कथा
गुस्टॉव्ह फ्लॉबर्ट ह्या प्रथितयश साहित्यिकाने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतला. फ्लॉबर्टच्या घरी त्याची एमिल झोला व रशियन कादंबरीवर आयव्हॅन तुर्गानेव्ह यांच्याबरोबर भेट झाली. ते दोघेही वास्तववादी लिखाणाचे पुरस्कर्ते होते. १८७५मधे फ्लॉबर्टच्या उत्तेजनाने त्याने एक विनोदी नाटक लिहिले व त्यांत कामही केले.
१८७८मधे त्याची बदली माहिती मंत्रालयाकडे करण्यात आली व तिथे वृत्तपत्रांसाठी लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ते काम करून त्याला खूप फावला वेळ मिळे. त्या वेळांत त्याने कथा व कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. १८८०मधे त्याने बौल द सीफ ह्या नांवाने त्याच्या मते त्याचा “मास्टरपीस” प्रसिध्द केला.
ती छोटी कादंबरीच होती. त्याचे वाचकांनी स्वागत केले. फ्लॉबर्टनेही त्याची स्तुती केली. लागलीच त्याने दोन कथा लिहिल्या व त्याही खूप गाजल्या. […]
भारत सुवर्णभूमी…
भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात, जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हे बसेरा, वह भारत देश हे मेरा ….. या गाण्यातील एका वाक्यातूनच सुवर्णभूमी भारत देशाची महती विशद होते. […]
भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली. […]