कादंबरी ते नाटककार एक प्रवास
ईश्वर प्रेरणेने आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत असतात. ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ हे चरित्र म्हणजे माझ्या आयुष्यातील योगायोग म्हणावा लागेल, किंबहुना हा दैवी चमत्कारच ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. विवेकानंदांचे चरित्र वाचता वाचता सांगत गेलो, सांगता सांगता लिहीत गेलो. ते लोकांना आवडेल, त्यांनी उचलून धरले. हे कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत. […]