नवीन लेखन...

२६/११- आमची “मिती “

या तारखेची ताजी भळाळती खूण आत्ता दुपारी नेटफ्लिक्स वर पाहिली – ” मेजर ” ! हा चित्रपट दोन दमात बघून संपवला. एका बैठकीत असले इंटेन्स पिक्चर्स आजकाल सहन होत नाही. मेजर उन्नीकृष्णन यांचे २६/११ चे बलिदान आणि पूर्णतया NSG अँगलने केलेला हा चित्रपट! […]

एक नवी जबाबदारी

‘भावनिक जगातील या उलथापालथीनंतर व्यावहारिक जग माझी वाट पहात होते, भाऊ गेल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी या व्यावहारिक जगाच्या मैदानात मला उतरावे लागले. कारण आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवहार सुरूच होते. माझे काका गजानन जोशी, वसंत जोशी, श्रीकृष्ण जोशी, माझे मामा सुरेश धनवटकर आणि आमच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि भाऊंचे जवळचे मित्र सहदेव चौगुले यांच्या सल्ल्यानुसार माझे […]

।। मनाचे श्लोक-एक दृष्टिक्षेप ।।

“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात. […]

भुताला बढती

मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला. […]

वेगळा (कथा) भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” […]

‘लता’

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो.. […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ३ – पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा

पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा: हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष […]

देवभूमीतील पंचबद्री  – आदीबद्री

आदीबद्रीचे मंदिर कर्णप्रयाग-रानीखेत रस्त्यावर कर्णप्रयागापासून १८ कि.मी. आहे. बसेस, जीप इ. वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. आदीबद्रीचे मंदिर हे चौदा मंदिरांचे संकुल असून साधारण ५० x २० मी. क्षेत्रावर पसरले आहे. ही सर्व मंदिरे चौथऱ्यावर स्थापीत असून त्यातले सर्वात महत्त्वाचे मंदीर म्हणजे आदीबद्रीचे! मंदीर फारसे मोठे नाही पण मंदिरावरील शिल्पकाम सुरेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात साडेचार ते […]

ॲंटोन चेकॉव्ह याची चरीत्र-कथा

चेकॉव्हच्या कथांत दिसून येणाऱ्या बंडखोरीचा उगम आईला व मुलांना त्यांच्याकडून मिळणारी हिंसक वागणूक यामधे असावा, असा एक तर्क कांही समीक्षक लावतात. चेकॉव्ह डॉक्टर होता व तो मजेत म्हणत असे, “वैद्यकी ही माझी कायदेशीर पत्नी आहे तर साहित्य हे माझे बाहेरचे “प्रकरण” आहे.” […]

भारतमातेच्या वीरांगना – २२ – कॅप्टन लक्ष्मी सहगल

सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले. […]

1 17 18 19 20 21 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..