नवीन लेखन...

ती पाहताच बाला

‘लग्नाची बेडी’ या नाटकातील पद्मा चव्हाण यांची ‘रश्मी’ ज्यांनी पाहिली ते खरंच भाग्यवान!! ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..’ या काव्यपंक्तीनुसार त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचा ‘कलिजा’ शब्दशः खलास होत असे.. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लीन मन्रो’ व ‘सौंदर्याचा ॲ‍टमबाॅम्ब’ ही उपाधी दिली होती..
[…]

1 – रेल्वेची ‘मंडळी’ आणि विविध व्यवस्था – परिचय

रेल्वेचा इतिहास, रेल्वेचा प्रवास, या प्रवासात भेटलेली वेगवेगळी स्टेशन्स, या गोष्टी रेल्वेप्रेमींच्या आयुष्यातली जागा ‘सुंदर आठवणी’ म्हणून आपसुक व्यापून राहतात. या प्रवासादरम्यान, देशभर, अगदी कानाकोपऱ्यांत पसरलेल्या, रेल्वेच्या महाकाय जाळ्यामागच्या व्यवस्थेविषयीचं कुतूहलही मनात नकळत जागं होतं. […]

‘आखरी खत’

एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल…मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन…मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय…भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय…आपल्या आईला शोधत फिरतय… कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का? माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. ‘Truth is stranger […]

अवघड घाट यशाचा

माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात […]

भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे. […]

भगूर क्रांतीचे बीजारोपण

कष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते. व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये  प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख. […]

समज गैरसमज

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. “कचराऽऽ” ती केकाटली. इथे मी हैराण. […]

आतंकवादी

आजी वादी माजी वादी समाजवादी प्रजा समाजवादी लोकशाहीवादी हुकूमशाहीवादी मवाळवादी जहालवादी आस्तिक वादी नास्तिक वादी धर्मवादी अधर्मवादी भोगवादी चंगळवादी राष्ट्रवादी राष्ट्रीयवादी देशीवादी विदेशीवादी खादी वादी विलायतीवादी धर्मवादी धर्मनिरपेक्षवादी आचार वादी भ्रष्टाचारवादी जातीयवादी वंशवादी वर्णवादी वर्णद्वेषवादी काळेवादी गोरेवादी अणुवादी अणुयुद्धवादी वादी वादे जायते आतंकवादी (प्रसिद्धी लोकप्रभा साप्ताहिक ७ मार्च २००३) — विनायक अत्रे. दिनांक: ११/२/२००३. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेचे वर्ल्ड […]

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा) – भाग – २

शीर्षक: Beyond Horizon.. (क्षितिजापलीकडले) प्रकरण दुसरे समीर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवत घरी निघाला.. काय घडले होते काही महिन्यांपूर्वी??? काही महिन्यांपूर्वी…… प्राध्यापक वसिष्ठ आपल्या बी. एस्.सी. – ऍस्ट्रो फिजिक्सच्या वर्गात बिग बँग थियरी शिकवत होते. लहानपणापासून प्राध्यापक खूप हुशार! खगोल शास्त्राची खूप आवड. सुट्ट्यांमध्ये जमेल तसे रात्री आकाश न्याहाळणे हा त्यांचा आवडता छंद! कुठल्या तरी विज्ञान […]

सुगम संगीताला प्रारंभ

आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले. अनेक कॅसेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो. पण माझी संपूर्ण कॅसेट […]

1 22 23 24 25 26 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..