भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी
मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’ […]