नवीन लेखन...

जागतिक बिकिनी डे

त्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली. […]

व्यवहारिक जगतात

फायनल परीक्षेच्या वेळेपासूनच व्ही.जे.टी.आय.मध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू सुरू झाले. आमचे कॉलेज उत्तम रँकिंगचे असल्याने अनेक मोठ्या कंपन्या नोकरी देण्यासाठी येऊ लागल्या. त्यावेळी व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनियर होणाऱ्या मुलांच्या खिशात दोन ते तीन कंपन्यांची अपॉईंटमेंट लेटर्स असत. एकंदरीत उत्तम नोकरी मिळणे त्यावेळी बरेच सोपे होते. निदान आमच्या कॉलेजसाठी तरी. एम.आय.डी.सी. च्या सरकारी नोकरीसाठी मी निवडलो गेलो आणि त्यानंतर एका इंटरनॅशनल […]

लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे . […]

पावसाची उजळणी

उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा… […]

।। श्री राम समर्थ ।। श्रीसमर्थ रामदासांचा पदसंग्रह – एक विचार

छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली. […]

‘प्रभात चित्र मंडळ’ संस्थेचा स्थापना दिन

‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना १९६८ साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे. […]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक

त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. […]

कलादिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक विष्णू गोविंद दामले

दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले.‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला. […]

लेखक द. पां. खांबेटे

उपहास, माझे नाव रमाकांत वालावलकर, नवऱ्याचे संगोपन, प्रेमाची देणीघेणी, मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी, पन्नास वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल, स्वयंसूचना, आटपा रे आटपा लवकर, पोटिमा (पोटावर टिचकी मारा), हसत खेळत मनाची ओळख अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]

लेखक आनंद साधले

त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे. […]

1 28 29 30 31 32 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..