नवीन लेखन...

आईच्या बांगड्या

क्रांतीच्या वेळी आई मुलाला म्हणाली वाणाचं सामान आणायचे आहे पैसे देतोस का मुलानी काही रुपये काढून दिले. अरे आणखीन थोडे देतोस का बांगड्या भरायच्या आहेत मला. बांगड्या आहेत ना हातात. आई मान खाली घालून गप्प. आणि तसेही बांगड्या घातल्या शिवाय सण साजरा होत नाही का? आई मुकाट्याने बाहेर गेली. तोच चला मी तयार आहे मला साडी घ्यायची आहे सणासाठी. आणि आई थोड्याच दिवसा नतंर बांगड्या न भरताच या जगातून निघून गेली. […]

नशीब

एखादी किरकोळ गोष्टही कधी मनासारखी घडली नाही की आपण लगेचच नशीबाला दोष देतो. आपण सोडून इतर सर्वांना नशीब भरभरुन साद देतं. मात्र आपल्या वाटेला वणवण पाचवीलाच पूजलेली, असं सर्वांनाच वाटतं! दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचं नातं थेट नशीबाशीच जोडलेलं असतं का? आणि संपूर्ण आयुष्य नशीबाला दोष देत रडतखडत जगणं कितपत योग्य आहे याचा कधीतरी विचार नको […]

असेन मी, नसेन मी !

आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली. […]

गझल गायनाला शुभारंभ

लवकरच रेडिओवर तीन मराठी गाणी सादर करण्याचे कॉन्ट्रॅक्ट माझ्या घरी आले आणि गाणी घेऊन मी रेडिओच्या ऑफिसमध्ये गेलो. संगीतकार भूमानंद बोगम यांची भेट झाली आणि या पूर्वी कोणत्याही कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी सादर करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नवीन गाणी मिळवण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली आणि मला एकदम आठवण झाली संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या […]

होके मजबूर मुझे

१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. […]

निपटारा – भाग  3

दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना. मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही ‘डोंगरमाथ्यावरील जंगल’ असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध ‘चौक’ या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका […]

त्यांच्या तत्त्वाच्या प्रकाशात

प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो. […]

भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली. […]

रथसप्तमी आहे आंनदाची

रथसप्तमीला संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाची सांगता होते. आज सूर्य रथात बसून जात आहे अशी रांगोळी काढून त्यासमोरील बाजूस गोवरीच्या खांडावर छोट्या मातीच्या सुगड्यात दूध उतू घातले जाते आणि ते पूर्वेकडील बाजूस उतू जाणे शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशीचे औचित्य साधून लेकीने घरसजावटी बरोबरच सूर्य रथाची आरास केली आहे. […]

1 34 35 36 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..