अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’ […]