‘गर्जते मराठी’त सहभाग
२००९ वर्षाची सुरुवात ‘गानहिरा’ या सुगम संगीत स्पर्धेच्या परीक्षणाने झाली. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. परीक्षक म्हणून माझ्याबरोबर संगीतकार कौशल इनामदार होता. ‘अरे, तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे. स्पर्धेनंतर जेवायलाच जाऊ या.’ कौशल म्हणाला. ‘मराठी अस्मिता’साठी कौशल ‘मराठी अभिमान गीत’ रेकॉर्ड करणार होता. ख्यातनाम कवी सुरेश भट यांचे शब्द होते […]