‘३८, कृष्ण व्हिला’ – सुघड साहित्यिक गुंतागुंत !
मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत. […]