भारतमातेच्या वीरांगना – ४९ – कुट्टी मालू अम्मा
१९३२ साली असहकार आंदोलन,सविनय कायदा भंग ह्या सगळ्यात त्यांनी भरपूर काम केले. एक मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यात कुट्टी मालू ह्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व देखील केले त्यावेळी त्यांची मुलगी केवळ दोन महिन्यांची होती. इंग्रजांचे दडपशाही चे धोरण सर्वश्रुत आहेच. त्यांनी महिला, मुलं, अबाल-वृद्ध काहीच बघितले नाही आणि सगळ्यांना देशद्रोही म्हणून कारावासात टाकणे सुरू केले. कुट्टी मालू ह्यांना सुद्धा २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली, त्यांच्या दोन महिन्यांच्या तान्हुली बरोबर त्यांनी कारावास भोगला. प्रत्येक चळवळ जी भारताला स्वातंत्र्य देऊ शकेल अश्या सगळ्यात कुट्टी मालू ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, मग ते सविनय कायदे भंग, असहकार आंदोलन किव्हा चले जाव चळवळ. प्रत्येकवेळी त्याची शिक्षा ही ठरलेली, कारावास कालावधी फक्त वेगळा होता. कारावसातून सुटून आल्यावर त्या अजून जोमाने कामाला लागायच्या. […]