रेल्वे प्लॅटफॉर्मवरील निराधार मुलं
भारतातील बऱ्याच मुख्य स्टेशनांच्या अगदी एका टोकाला एखादा प्लॅटफॉर्म किंवा यार्डाची एखादी दुर्लक्षित बाजू अशी असते, जिथे रेल्वे डब्यांचा फारसा वावर नसतो; परंतु अशा जागी एखादा जुना मोडकळीस आलेला डबा कायमचा रुळांवर असतो. ५ ते २० वर्षे वयोगटातील अनेक मुलं-मुली या डब्यालाच आपलं घर मानून तिथे मुक्काम ठोकतात. यांतील बऱ्याच मुलांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही वेळा घरच्या जाचाला कंटाळून नाइलाजानं काही जण रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेतात. […]