MENU
नवीन लेखन...

नंदराज जटयात्रा – भाग 2

ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या […]

सुखी माणूस (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३७)

पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती. सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते. नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते. सर्व कसं शांत होतं. अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला. धाप लागल्यामुळे डब्यात […]

वक्तृत्वाचे सप्तसोपान

प्रसन्नवदन, रसाळ, ओघवती वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी-उर्दूतून सूफीझम ह्यावर देशात-परदेशात विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली. […]

ठाण्याचे अभिनेते

सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा. […]

मजल-दरमजल ६५०

सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक अशोक शेवडे यांच्या ‘सूर तेच छेडिता’ या कार्यक्रमाच्या अनेक प्रयोगात मी गायलो. माझ्याबरोबर मनोज टेंबे, मीनाक्षी गुणाजी, अलोक काटदरे, नीलाक्षी पेंढारकर, पुष्पा पागधरे असे अनेक कलाकार असायचे. निवेदनात अशोकजींच्या बरोबर प्राची देवस्थळी असायच्या. अशोकजींचे किस्से, विनोद आणि इतक्या कलाकारांच्या सहवासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच मजा यायची. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाला ७५ वर्षे […]

बायोकेमिस्ट्रीची सुरुवात

आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे ! […]

प. पू. आईंचे भजन-चिंतन

प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत […]

1 26 27 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..