नवीन लेखन...

उगाच काहीतरी – १० (एक प्रश्न आणि उत्तर)

“….. मग कसं चाललंय लाईफ ?” ….. ” समजा बायको ने तुम्हाला एक विशिष्ट भाजी आणायला सांगितली. तुम्ही बाजारात जाऊन ४ चकरा मारता पण तुम्हाला ती कुठेच दिसत नाही शेवटी कुठल्यातरी एक कोपऱ्यातल्या दुकानात तुम्हाला ती दिसते आणि काहीतरी मोठा तीर मारल्याच्या जोशात तुम्ही ती ५० रु किलो ने घेऊन येता आणि नेमका तुमच्याच बिल्डिंग खाली […]

गुंता

केसात गुंता झाला की कंगव्याच्या मोठ्या दातांनी तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. पण तो गुंता इतका पक्का असतो की सुटत तर नाहीच उलट खूप वेदना होतात सहन होत नाही म्हणून तो तोडूनच काढावा लागतो. आर्थात इच्छा होत नाही पण नाईलाजाने का होईना मान्य करावे लागते. आयुष्यात कधी ना कधी असे काही प्रश्न निर्माण झाले की […]

चक्र ऋतुंचे

जगायचे ते जगले नाही काही राहीले श्वासही भगवंताचे नाही काही आपुले जन्म, मृत्यु प्रवास ते भ्रमणही आपुले बाहुले, कळसूत्रीचे चक्र ऋतुंचे चालले दशदिशा भारलेल्या नेत्री दृष्टांत रंगलेले भोगणेच संचिताचे या जन्मी लाभलेले पसरूनी दोन्ही बाहु क्षणक्षण ते झेललेले हेच सत्य साक्षात्कारी अस्ताचली सांज रंगले — वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७४ २०/७/२०२२

हरहुन्नरी गीतकार संवाद लेखक-राजेंद्र कृष्ण

१९४८ गांधीहत्येनंतर त्यांनी “सुनो,सुनो,ऐ दुनियावालो बापूजीकी अमर कहानी” गाणे लिहिले जे रफिसाहीबानी गायले होते संगीत होते,हुस्नलाल भगतराम यांचे. ते प्रचंड गाजले. “बडी बहन” ची गाणी खूप गाजली.त्याबद्दल निर्मात्याने  त्यांना ओस्तिन कार  भेट दिली.त्यांनी हिंदीतल्या जवळजवळ सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले.हुस्नलाल भगतराम पासून ते आर.डी.बर्मन पर्यंत.एका झटक्यात गाणी लिहिणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांची गाणी लिहिण्यावर इतकी हुकुमत होती कि ते लिहायला कागद नसेल तर पाच मिनिटात सिगारेटच्या पाकिटावर गाणे लिहित असत.. […]

काही गोष्टी नाहीच मिळाल्यात….

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये विश्वंभर दास यांनी लिहिलेला हा लेख ‘वीस वर्षानंतर तुम्ही नाराज व्हाल अशासाठी की ज्या गोष्टी तुम्ही करू शकलात त्यापेक्षा तुम्ही काही गोष्टी करू शकला नाहीत यामुळे’ या उक्तीने मी माझे विचार मांडणार आहे. जगात असं कुणीही नसेल की त्याला आयुष्यात काहीतरी मिळवावयाचे स्वप्न नसेल अगदी रस्त्यावरील भिकारी याचे देखील काही […]

अलिप्त आणि तटस्थ

आज विद्या सिन्हाची स्मृती डोकावली – रजनीगंधा, छोटीसी बात वाली ! पण तात्काळ कवाडे बंद करत मी अलिप्त /तटस्थपणा चेहेऱ्यावर विणला. थोडासा विलगलो पण आठवणींचे पार पिच्छा सोडत नाहीत.नेमाने उगविले-मावळले त्याच्यासारखे तर कदाचित जमेल. प्रयत्न करून बघावे म्हणतोय. […]

गप्पा निळाईशी

असेच एका सायंकाळी, सहजी पाहिले आकाशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. उलगडलो उघड्या जमिनीवरती, अनं हाताची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. आंथरलेला होता वरती, मैलोगणती गालीचा , चमचमणारी नक्षी त्यावरी, वापर केला ताऱ्यांचा. रेलायाला बैठकीवरी, मऊशार ढगांची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. एकेरीवर आलो अनं मी, साद घातली देवाला […]

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह 

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह  महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः । अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्  ।।३५।। मराठी- सदाशिव सोडून दुसरा (कोणीही श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून अन्य (कोणतेही श्रेष्ठ) स्तुतीस्तोत्र नाही. अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरू (शिव) पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही. सर्वश्रेष्ठ शिव स्थानी, श्रेष्ठ स्तोत्र महिम्न से […]

दत्तात्रय काप्रेकर – एक असामान्य गणिती

बऱ्याच जणांना गणित आवडत नाही पण गणितात खूप गमती जमती असतात. आज अशाच काही गमती आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या गमती काही विशिष्ट आकड्यांशी आणि एका व्यक्तीशी संबंधित आहेत. त्या व्यक्तीचं नाव दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर. […]

सुटका

बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं. […]

1 5 6 7 8 9 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..