रंग काळा
काळेभोर डोळे, काळा लांबसडक केशसंभार ही एकेकाळी सौंदर्याची प्रतीकं मानली जात होती. आज लांबसडक केशसंभार सांभाळायला, त्याची निगा राखायला वेळच उरलेला नाही. असो, आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये […]