जीवन
विसरुनिया अस्तित्वाला निसर्गात एकरूप व्हावे क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा एकांती आत्ममुख व्हावे…. शमता अशांत कोलाहल हळूच मागे वळूनी पहावे शिशुशैवव, पौगंड यौवन पुन:, पुनः,पुनः आठवावे…. वास्तव, हे भाग्य भाळीचे ते, वात्सल्यप्रेम आठवावे व्याकुळ उर, भरूनी येता मौनी अश्रुंना प्राशित रहावे…. जे लाभले ते दान प्राक्तनी अंतर्मुख ! सदा होत रहावे सुख,दुःख, संवेदनां, चिंता रेतीवरच्याच, रेषा समजावे…. वास्तवता […]