नवीन लेखन...

विचारसरणी

बायको अशिक्षित किंवा कमी शिक्षण घेतलेल्या अनेक जणी आहेत पण त्यांचा संसार उत्तम झाला आहे याची अनेक उदाहरणे आहेत ती केवळ विचारसरणी या मुळेच आणि तसेही नवरा बायको पेक्षा कमी शिकलेला नसावा असा नियम आहे का?
[…]

कृतकृत्य

निसर्ग भगवंताचे रूप स्पर्श दिव्य अनामिक लाभता या स्पंदनांना आत्मिक शांती सात्विक…. अविष्कार पंचभुतांचे सदा सर्वदा सौख्यदायक नक्षत्रे अलंकार सृष्टिचे लोचनी उमले नंदनवन…. क्षण सारेच भारावलेले स्वानुभूतिच आनंदघन दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ मनमनांतर पावन पावन…. सृजनता ही अलौकिक झुळझुळते तृप्त जीवन निर्मोही, भाव परस्पर निरंतर कृतकृत्य जीवन…. –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.१९२ ८/८/२०२२

गुरुदत्तची अजरामर कलाकृति-प्यासा

एक गाणे तर चक्क मोहमद रफीने कंपोज केले आहे. सचिनदा आले नव्हते, रफीने आधी नकार दिला होता. साहीर आला होता व ते रेकोर्ड झाले नसते तर रेकोर्डिंगचे पैसे वाया गेले असते, ते गाणे होते “तंग आ चुके है “ […]

अडथळ्यांची शर्यत

शेवटी सगळे अडथळे पार करून रात्री जाण्याचे नक्की झाले. त्यावेळी भांडूपमध्ये आमच्या घरी फोन नव्हता. त्यामुळे ह्यांच्याकडून आलेल्या एकमेव अस्पष्ट ऐकू आलेल्या फोनवर व त्यांनी दिलेल्या फ्रान्सच्या विमानतळाच्या माहितीवर काम चालवायचे होते. त्यातच माझे मधले ३ दिवस घरच्या अडचणींमध्ये वाया गेले होते. महिनाभर रहायचे होते, जरी तिकडे उन्हाळा होता, तरी आमच्यासाठी ती थंडीच! त्यामुळे गरम कपडे, खाण्याचे भरपूर पदार्थ…. बापरे…यादी संपतच नव्हती. आठवून आठवून सामान गोळा होत होते. कसेबसे सगळे कोंबले गेले. […]

संत तुकाराम: ऐहिकाकडून अलौकिकाकडे

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन […]

तळा ‘गाळातले ‘

मध्यंतरी आमच्या सोसायटीची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज व्यवस्था तुंबली. त्यातच पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचं पाणी, गटार भरून वहाणाऱ्या सांडपाण्यात मिसळून दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढू लागला. सोसायटीच्या केरकचरा, सफाई करणाऱ्याला विचारलं, त्याने असमर्थता दर्शवली, पण दुसऱ्या दिवशी दोन माणसांना या कामासाठी तो घेऊन आला आणि म्हणाला, “हे करून देतील काम”. काळया वर्णाचे, उघडे, किरकोळ शरीरयष्टी, चेहरा […]

पेंग्विनची वाटचाल

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती. […]

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही. […]

उगाच काहीतरी – १७

सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी. […]

इतिकर्तव्यता

आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे. […]

1 13 14 15 16 17 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..