नवीन लेखन...

बृहन्मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग)

एक सुखकारक अनुभव मुंबई महानगरपालिका , त्यांची कार्यपद्धती , गोंधळाचं वातावरण , हलगर्जीपणा आणि त्यातूनही महानगरपालिकेची इस्पितळं तर फारच भयानक , केविलवाणी परिस्थिती , तिथे येणारे रुग्ण , डॉक्टरांचा निष्काळजीपणा यावर आपण नेहमीच बोलत असतो , बोटं मोडत असतो. या संपूर्ण कोरोना काळात तर मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांबद्दल सतत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. या सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर […]

मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)

नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो. […]

अदुबाळा

ये अदुबाळा ये लडिवाळा माझ्या प्राजक्ताच्या फुला आसुसतो मी, आतुरतो मी तुझ्या गोड, बोबड्या बोला लावतात लळा मला तुझ्या लडिवाळ लीला पाहून तुझा गोजिरवाणा चाळा ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा नाजूक साजूक मोहक क्षणांचा या भरवावा आनंदमेळा उधळावे आयुष्याचे संचित त्यावरुन ओवाळून गोळा – यतीन सामंत

उगाच काहीतरी – १५

आपण खरेदी केलेल्या प्रत्येक मालाच्या मागे एवढ्या लोकांचा सहभाग असतो आणि या लोकांवर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे असल्या मेसेजेस मुळे प्रभावित होऊन समोर दिसणाऱ्या एका गरिबाला मदत करण्याच्या नादात कमी खरेदी करून वरील एवढ्या लोकांच्या दिवाळीच्या सणा वरती आपण पाणी फिरवू शकतो. […]

मी आहे म्हणून

उमा काकू घरातील कामे भरभरा उरकून हळदीकुंकूवाला जायची तयारी करु लागल्या. पंत निवृत्त पेन्शन वर घर चालते. मुलींची लग्न झाली आहेत. मुले आपापल्या नोकरीत संसारात. चैत्र महिन्यात उमा काकू ना फारच भाव मिळतो. आणि गावातल्या प्रत्येक घरी जायचे म्हणजे लवकरच निघायला हवं. पिशवी घेऊन जाताना म्हणाल्या जाऊन येते. पंत पण फिरायला बाहेर पडले. पूर्वीचा काळ जिथे […]

सुंदर सत्य

जीवन हा श्वास आहे स्मरणगंधी ध्यास आहे… कळीकळीने उमलावे फुलांनी दरवळणे आहे… सभोवारी गंधाळावे सत्कर्मी आव्हान आहे… सुखदुःखांच्या सरोवरी मुक्त असे डुंबणे आहे… प्रवाहा विरुद्ध पोहणे पुरुषार्थाची कमाल आहे… विवेकाची साथ असावी अप्राप्यही, प्राप्त आहे… मनामनांत नित्य रहावे तीच खरी मन:शांती आहे… द्वैत, अद्वैत एकरूपता निर्मलतेचे प्रतिबिंब आहे… कानी मंजुळ धुन मुरलीची आत्मानंदी सुंदर सत्य आहे… […]

संत तुकाराम महाराज

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे  यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे […]

चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे). […]

भावपूर्ण

भाव प्रकट होणं म्हणजे काय? तुकोबा म्हणतात, “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.” म्हणजेच माझ्या मनातले विचार, माझी मनोवस्था, मनातली चलबिचल, मनातले भाव चेहऱ्यावरून, शब्दामधून, अभिनयामधून, गायनामधून किंवा आपण करत असलेल्या कोणत्याही कार्यामधून समोर येत असतात. आपल्याकडे नाट्यधर्मी, रंगधर्मी, कलाधर्मी, चित्रधर्मी, काव्यधर्मी असे शब्द पूर्वी रूढ होते. त्या त्या धर्माचं आचरण करणारा तो धर्मी. या कलेच्या परिभाषा पुढे […]

एक परीस स्पर्श (भाग – ५८)

आज विजय एका कारखान्यात त्या कारखान्याच्या मालकाला भेटायला गेला होता. त्या मालकाने हा कारखाना नव्यानेच सुरु केला होता. त्या कारखान्याचा मालक उत्तरभारतीय होता. त्याची बायको गर्भारपणात वारली त्यामुळे त्याला बरेच दिवस गावी थांबायला लागल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा नोकरी सोडल्यामुळे आलेल्या पैशातून दोन लेथ मशीन विकत घेऊन छोटासा कारखाना […]

1 17 18 19 20 21 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..