नवीन लेखन...

घरपण

दगड़ा मातीच्या विटांनी उभारलेल्या चार भिंतित मनातलं घरपण सजलयं फुलदाणीच्या फुलांफुलात….. सुखाला शोधित शोधित दुःखांना निवारत निवारत जणु सप्तरंगली सावलीच उतरलीय नभातून अंगणात…. पण मन माझं भिरभिरतय एकटंच निरभ्र नभांगणात उरि, प्रारब्धाला कवटाळत गुंतलय ऋणानुबंधी पाशात…. काळ, झरझर सरतो आहे मनामनांत, मनेही गुंतलीत सारं काही छान होणार आहे हा भाव जपला आहे अंतरात…. — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

संत संगती

संत एकदा आपल्या वाट्याला आले की ते “जेथे जाऊ तेथे” सतत सोबत करत असतात- हरीप्रसाद /किशोर/उस्मान च्या रूपात ! मग वेगळ्या दर्शनाची, वारीची गरज पडत नाही. ते असतातच! […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ५ – सावरकरांची कृतज्ञता

१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली. श्री शं. ग. चापेकर त्यावेळी वर्ग चालवत. त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले. सावरकरांनी त्यांना विचारले “आपण कोण ?”  ते म्हणाले “मी चापेकर” सावरकर म्हणाले “ चापेकरांनी सावरकरांना हार नाही घालायचा. मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली. असे म्हणून त्यांनी आपल्या […]

छोटा पेग

मारुतराव चिकटे, वय अंदाजे चाळीस वर्षे, कोल्हापुरातल्या ‘चिकटे रेस्टॉरंट आणि बार’चे उंच पण तुंदिलतनु मालक. चिकटेमालक त्यांच्या ओळखीच्या मंडळीत सरनोबतवाडीतले मोठे ‘जबराट बिझनेसमॅन’ होते. बॉक-बॉक-बॉक-बॉक आवाज काढणाऱ्या बुलेट मोटरसायकलवरून ते रोज सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला येत असत. त्यांच्या शेताला लागूनच एक छोटासा जमिनीचा तुकडा रखमाबाई सरनोबत ह्या सत्तरी गाठलेल्या, अंगाची धनुकली झालेल्या म्हातारीच्या मालकीचा होता. […]

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – भाग – ३

मला जर कोणी विचारले की “स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय?” एका क्षणाचाही विलंब न लावता मी हिमालयाचे नाव घेईन. या नगाधिराजाचे रूप दिवसाच्या प्रत्येक प्रहरात, प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे असते. विशेषत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याचे दिसणारे रूप अतिशय मोहक असते. निळ्याभोर आकाशात रेंगाळणाऱ्या मेघमाला, काही मेघ पर्वत शिखरांभोवती रुंजी घालत असतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आकाशाचा वेध घेणारी हिमशिखरे, […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ९ – शुष्क पठारा वरील जंगलातील बहुउपयोगी वृक्ष – बाभूळ

बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे. […]

सहयोग

आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का? […]

स्वर्गसुखदा

तुला पाहता मी मज हरवुनी जाते विसरुनी सारे, तुझ्या रुपात रंगते… अंतरी, वेड प्रीतीचे लडिवाळ लाघवी तुला आठविता, सारे भुलुनी जाते… स्पर्शात तुझ्या ते स्वर्गसुख आगळे निर्मलतेच्या भवसागरी मी अविरत डुंबते… क्षणक्षण भावप्रीतीचे अधीर आसुसलेले अथांग प्रीतसागरी मी तृप्त सचैल नाहते… –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१५ २४/८/२०२

तृप्तलो आता

मालवुनी टाक रे, दीप तू आता मन शांत जाहले, तृप्तलो आता.. उजळल्या अंतरी, नाना गतस्मृती थकलो स्मृतींचे, भार पेलता पेलता.. कोवळी मध्यान्न, गेली सांजाळूनी सांजेसवे लपली, यामिनीच आता.. निवता लोचने, हुरहुर स्पंदनांना चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा.. मालवुनी टाक रे, दीप तू आता.. मन शांत जाहले, तृप्तलो आता.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२३९ १८/९/ २०२२

नाट्यभूमीचा मुसाफिर : डॉ. मुरलीधर गोडे

ठाण्याच्या धुळीधुळीच्या कणाकणांत नाटक सामावलेले आहे. त्यामुळे ठाण्यात जन्मलेल्या मुरलीधर गोडे यांच्या नाकातोंडात हे नाटकाचे धूलिकण न घुसते तरच नवल! त्यांचे शालेय जीवन महाडच्या परांजपे विद्यामंदिरात गेले. विद्यार्थी असताना मो. ग. रांगणेकरांच्या ‘आशीर्वाद’ व ‘माझे घर’ या नाटकात आणि ‘ध चा मा’ या ऐतिहासिक नाटकात अभिनय करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. एम.ए., बी.एड्. झाल्यानंतर १९६३ पासून […]

1 4 5 6 7 8 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..