शब्द, शब्द, शब्द, शब्द!
गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय. […]