नवीन लेखन...

साबुदाण्याची खिचडी

असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ३ – सावरकरांचे धैर्य

सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” […]

कळेना

तू पाप की पुण्य ?….कळेना . तू स्वार्थ की परमार्थ ?…. कळेना. तू विष की अमृत ? ……कळेना. तू छंद की आसक्ती ?….कळेना. तू ध्यास की भास ?……. कळेना. तू आस की आभास ?……कळेना. तू नस की फास ?……कळेना. तू श्वास की भ्रमनिरास ?…..कळेना. तू मृगजळ की शाश्वत ?…… कळेना. तू शांती की तगमग ?……. कळेना. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय नववा – राजविद्याराजगुह्य योग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय श्रीभगवानुवाच । इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ श्री भगवान म्हणाले, निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १ राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । […]

हेमकुंड/ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – भाग -१

श्रीहरीने आपले नेत्रकमल उघडले आणि विश्वकल्याणासाठी त्याने सुरू केलेल्या तपोसाधनेची सांगता झाली. चराचरात ॐकार भरून राहिला होता. एक छोटेसे बोरीचे झाड श्रीहरीवर सावली धरून उभे होते. तेच तपोसाधनेच्या काळात ऊन, वारा, पाऊस, बर्फापासून श्रीहरीचे रक्षण करत होते. श्रीहरीने ओळखले, ‘आदिमाया महालक्ष्मीच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपले रक्षण करत होती.’ तो विश्वाचा पालनकर्ता मनोमन सुखावला. प्रसन्न होऊन […]

महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’

त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या. […]

ध्यास

मज नाही अजुनही कळले नाते, तुझे नी माझे कसले… परी नित्य ध्यास तुझा अंतरी हेच सत्य, निरागस मनातले… श्वासा श्वासात तूच सांगाती सावलीत रूप तुझे सांडलेले… बैचन करते हे गूढ अनामिक सांगु कुणास, मी हे मनातले… तुही अशीच निःशब्द अबोली मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले… तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां सहजी सांगुनी जाती मनातले… पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे जन्मी, […]

पिरॅमिडसच्या देशात

१०-१२ वर्षापूर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर, हॉटेलमध्ये, चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या. […]

पहिले बालनाट्य संमेलन

ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी […]

शाईपेन,, लेखणी

….. हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत […]

1 7 8 9 10 11 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..