युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ३
स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. […]